जाहिरात
आपला जिल्हा

पूराच्या पाण्यात अडकलेल्या ५ व्यक्तींचा आपत्ती व्यवस्थापन पथकाने केला बचाव

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१७ जुलै)

गडचिरोली जिल्यात व तालुक्यात आज झालेल्या अति पावसामुळे दुपारी ३ वाजता गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा ते कुंभी दरम्यान शेतात कामावर गेलेले ५ व्यक्ती जोरदार झालेल्या पावसामुळे स्थानिक नाल्याला आलेल्या पूरामुळे नदी व नाल्याचे मध्ये अडकले असल्याचे तहसील कार्यालय गडचिरोली द्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये सुचना मिळताच तात्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे पथकास घटना स्थळी रवाना करण्यात आले.

सदरचे पथकांनी तातडीने बोटीचे तसेच शोध व बचावाचे सहाय्याने सर्व अडकलेले व्यक्तींना सायंकाळी ५ वाजता सुरक्षित नाल्याचे पाण्याबाहेर काढून बचाव करण्यात आला.अडकलेल्या व्यक्तीची नावे अनुक्रमे प्रमोद श्रावण बोबाटे वय ३८ रा.गुरवळा,शेखर उईके वय ४८ रा.गडचिरोली,सतिश चुधरी वय ३८ रा.विहीरगाव,संजय बोरकुटे वय ४५ रा.विहीरगाव,कुणाल बर्डे वय २१ रा.लेखामेंढा यांचा सुरक्षित बचाव करण्यात आला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button