जाहिरात
ताज्या घडामोडी

योगाजी कुडवे गडचिरोली भुषण पुरस्काराने सन्मानित

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,१ जुलै)

गडचिरोली जिल्यात समाजसेवा करणारे आंबेशिवणी येथील रहिवासी योगाजी कुडवे यांना दि,२९ जून ला हॉटेल तुली एमपेरियाल रामदास पेठ  संत्रानगरी नागपूर येथे पार पडलेल्या शानदार समारंभात जनतेचा ध्यास… लोकांचा विश्वास लोकमत गडचिरोली भुषण पुरस्कार २०२४ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते योगाजी कुडवे यांना गडचिरोली भुषण पुरस्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 

गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा याप्रसंगी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी खासदार तथा लोकमत समुहाचे अध्यक्ष डॉ. विजयजी दर्डा,प्रमुख अतिथी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, विशेष अतिथी प्रसिध्द चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर,प्रमुख अतिथी राजकुमार बडोले माजी सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.

योगाजी कुडवे यांना गडचिरोली भूषण पुरस्कार मिळाल्याने गडचिरोली जिल्यात व त्यांच्या गावी आनंद साजरा करण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button