चामोर्शी ठाण्याचे निलंबित ठाणेदार खांडवे यांनी केली होती १० जणांना मारहाण, पीडितांची पत्रकार परिषद
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ मे)
दि,२० एप्रिल २०२३ च्या पहाटे ४ वाजता च्या दरम्यान गाडी मालक व चालक मोहन गुलाब मोहूर्ले यांच्या स्कॉर्पिओ वाहनाने (MH-46-BA-7088)
कालेश्वर ला दर्शनासाठी जात असताना चामोर्शी येथील (T point) स्टेट बँक ऑफ इंडिया चामोर्शी जवळ वाहन थांबवून त्यांना पोलिस स्टेशन ला नेऊन ठाणेदार खांडवे यांनी बाजीराव पठ्ठा चा चोप व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची माहिती आज स्थानिक विश्रामगृह येथे पार पाडलेल्या पत्रकार परिषदेत पीडित १० जणांनी दिली. यात एका ७५ वर्षीय वयस्काचा पण समावेश आहे.
मारहाण झालेल्या १० जणांना खोटया गुन्ह्यात अडकवण्याची दिली होती खांडवे यांनी धमकी,
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी काल न्यायाधीशांना शिवीगाळ प्रकरणी खांडवे यांना निलंबित केले आहे. खांडवे यांचे निलंबन होताच पीडित आज बाहेर आले.व पत्रकार परिषद घेऊन आपबीती सांगितली.
(पत्रकार परिषदेत झालेल्या मारहाणीची आपबिती सांगताना रामसिंग श्यामजी राठोड ( वय ७५ वर्ष) व पीडित)
मोहन गुलाब मोहूर्ले रा. मुरमुरी रामसिंग शामजी राठोड (वय ७५ वर्ष) रावणपल्ली,भाऊराव विठ्ठल कुमरे पावीमुरांडा, अश्विन प्रताप रायसीडाम पावीमुरांडा, मोरेश्वर बालाजी कुनघाडकर नवतळा, पंकज कालिदास मेश्राम जोगना, किशोर तुळशीराम कुनघाडकर भाडभीडी,अंकेश हरिदास शेंडे मुरमुरी, सिताराम किट्टू पदा मुतनुर, भूषण रमेश दहेलकर फोकुर्डी सर्व चामोर्शी तालुक्यातील पीडित पत्रकार परिषदेला हजर होते .
