जाहिरात
गडचिरोली

गडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार

आमदार डॉ देवराव होळी यांच्या प्रयत्नांना यश

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२१ जून)

मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्याकरिता आमदार डॉ देवराव होळी यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मेडिकल कॉलेजच्या या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आज मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये संबंधितांना निर्देशित केले.

आमदार डॉ देवराव होळी यांच्या विनंतीवरून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज मुंबई मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठकीचे आयोजन केले या बैठकीमध्ये गडचिरोली येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशप्रक्रिये सोबतच बांधकामा संदर्भात ,पदभरती संदर्भात, व यासंदर्भात राहिलेल्या अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून प्रवेश प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला आमदार डॉ देवराव होळी यांचे सह राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, कुलगुरू ,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,शिक्षण संचालक, आयुक्त , अधिक्षक अभियंता यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button