जाहिरात
गडचिरोली

३० जून ला तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार

संताजी सोशल मंडळ चा पुढाकार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ जुन)

संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही १० वी ८०% व १२ वी ला ७० टक्के च्या वर तसेच पीएचडी. एमपीएससी. यूपीएससी तसेच नवोदय. स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ३० जून २०२४ रोज रविवारला श्री संताजी भवन गडचिरोली येथे दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

सर्व गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे तसेच दारिद्र्यरेषेखालील १० व १२ वी येथील तीन विद्यार्थ्यांना स्वर्गीय श्रावण जी तरारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मा प्रमोद तरारे मुंबई यांच्यातर्फे प्रत्येकी २१ हजार रुपये स्कॉलरशिप म्हणून देण्यात येणार आहे.

तरी सर्व तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत, मोबाईल नंबर लिहून २५ जून २०२४ पर्यंत खालील संताजी मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडे जमा करावी प्राध्यापक देवानंद कांमडी. गोपीनाथ चांदेवार, सुरेश भाडेकर. अनिल बालपांडे, प्रमोद पिपरे.प्रभाकर वासेकर, राजेश इटनकर,राजेंद्र भरडकर, सुरेश निंबाळकर,सुधाकर लाकडे, रामराज करकाडे यांचे कडे जमा करावे असे आवाहन संताजी मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक देवानंद कांमडी यांनी केले आहे.
.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button