जाहिरात
देसाईगंज/वडसा

देसाईगंज वडसा येथे १४ मे रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हा स्तरीय भव्य मार्गदर्शन शिबीर.

मान्यवरांचे विविध विषयांवर होणार मार्गदर्शन..

Spread the love

शुभम खरवडे
शहर प्रतिनिधि (वडसा)

पद्मभुषण अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतिने जिल्हाभरातील सर्वसामान्य जनतेच्या हिताकरीता जनतेला त्यांच्या मुलभुत अधिकाराची जाणीव व्हावी व प्रत्येक ग्रामपातळीवर सक्षम ग्रामसभा तयार व्हावी या करीता ग्रामसभेचे अधिकार,पेसा ग्रामसभेचे अधिकार सोबत माहितीचे अधिकार ,दप्तर दिरंगाई,नागरीकाची सनद, गोर-गरीबांचे स्वस्त धान्य दुकानातील मिळणारे हक्काचे रेशन या व अन्य विषयावर शनिवार दिनांक १४ मे २०२२ रोजी मोजा देसाईगंज वडसा येथील फवारा चौका पासुन जवळ असलेल्या नैनपूर रोड वरील संत शिरोमणी गंजानन महाराज मंदीराच्या सभागृहात एक दिवशीय प्रशिक्षण तथा भव्य मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले असुन या कार्यक्रमाचे उदघाटक तथा मुख्य मार्गदर्शक भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे केंद्रीय सरचिटनिस अशोकजी शब्बन कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवजी घुले, महाराष्ट्र ग्राम पंचायत अभ्यासक,तथा केंद्रीय ग्रामीण विकास पंचायत राज,मार्गदर्शक भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे राज्य समिती विश्वस्त डाँ शिवनाथजी कुंभारे,पेसा ग्रामसभा अभ्यासक डाँ देवाजी तोफा,उपस्थीत राहणार आहेत ग्रामीण भागातील जनतेला ग्रामसभेच्या अधिकाराची जाणीव व्हावी.माझ्याआदीवासी बहुल भागातील नागरीकाना पेसा ग्रामसभा कळावी .माहिती अधिकार कायद्याचे व्यापक जनजाग्रूती व प्रचार,प्रसार व्हावे स्वस्त धान्य दुकानातील गोर-गरीब जनतेला नियमा प्रमाने त्याच्या हक्काचा रेशन मिळावा.यावर सखोल मार्गदर्शन होणार आहे तेव्हा सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील सरपंच,उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामस्थ बंधू आणि माता भगीणीनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन मान्यवराच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यावा.अनेकाना वरील प्रमाने त्यांच्या अधिकाराची जाणीव नाही. तेव्हा ग्रामीण भागातील ग्रामस्थाना लोकशिक्षणाची नितांत गरज आहे.या करीता १४ मे रोजी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे राज्य समिती विश्वस्त डाँ शिवनाथ कुंभारे,जिल्हाध्यक्ष विजय खरवडे,जिल्हा कार्याध्यक्ष योगाजी कुडवे,फुलचंद वाघाडे,सचिन भुसारी,पांडूरंग समर्थ,वडसा तालुका अध्यक्ष संतोष दुपारे,तालुका सचिव धनपाल कार ,ज्योतीताई कोमलवार,जोत्सना पारटवार,सुनीता पिंपळशेट्टीवार,रविन्द शेलोटे,चेतन कञोजवार,प्रविण चौधरी,पुंडलीक नागपूरकर,संतोष मल्यालवार,दिलीप पोटवार,तथा जिल्हाभरातील पदाधिका-यानी भव्य मार्गदर्शन शिबीरात उपस्थीत राहण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button