गडचिरोली
२१ एप्रिल ला विदर्भ मिरा अल्काश्री यांचा गडचिरोलीत संगीतमय सुंदरकांड पाठ कार्यक्रम

लोकशाही न्युज, गडचिरोली,(दि,११ एप्रिल)
विदर्भ मीरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुश्री अल्काश्री २१ एप्रिल रोजी गडचिरोलीत येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर कार्यक्रम रविवार दि,२१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत हनुमान लॉन, पोठेगाव बायपास रोड गडचिरोली येथे होईल. सुश्री अल्काश्री आपल्या मधुर वाणीतुन संगीतमय सुंदरकांड पाठ सादर करणार आहेत. कार्यक्रमानंतर लगेच महाप्रसादाचे वितरण सुद्धा करण्यात येईल.
तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरीबाई राजारामजी काबरा, जुगल काबरा, निलेश काबरा, शुभम काबरा यांनी केलेले आहे.
जाहिरात
