जाहिरात
दैनंदिन बातम्या

आलापल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा : शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१२ जून):

एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास करुन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मेलव्दारे सादर केलेल्या निवेदनात जयश्री वेळदा यांनी म्हटले आहे की, आलापल्ली बलात्कार प्रकरणात सहभागी आरोपी हे धार्मीक व जातीय तेढ निर्माण करणा-या संघटनेशी संबंधीत असल्याचे बोलल्या जात असल्याने आरोपींवर बलात्कार, बाल लैंगिक शोषण कायद्यासह ॲक्ट्रोसिटी एक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच या निषेधार्ह प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे काय? याचाही तपास करावा, अशीही मागणी जयश्री वेळदा यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button