जाहिरात
Uncategorizedगडचिरोली पोलीस

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला केले जेरबंद,गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,९ मे)

दि, २० मे रोजी पिडीत महिला आपले काम संपवून घराकडे जात असताना अचानक एकाएकी जबरदस्ती करून त्या इसमाने महिलेवर अत्याचार केला.त्या आरोपीला स्थनिक गुन्हे शाखेने शोधून जेरबंद केल्याची घटना आज घडली .

पीडित महिलेने पोलीस स्टेशन चामोशी येथे तक्रार केली, चामोर्शी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी तीच्या तक्रारीची दखल घेवून तीला उपचारा करिता महिला बाल रुग्णालय येथे दाखल केले,व पिडीतेचे रिपोर्ट व वैद्यकिय अहवालावरून पोस्टे चामोशी येथे अनोखी इसमावर गुन्ह नोंद करण्यात आला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस कुमार चिंता यांनी प्रकरणाचे स्थानिक गुन्हे शाखा, सह गडचिरोली पोलीस स्टेशन, चामोर्शी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथके तयार करून आरोपी करून आरोपी चा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील महिला अधिकारी रुपाली पाटील यांनी गावात भेट घेवुन विचारपूस केली असता या अत्याचार महिलेवर मानसिक आघात होवून ती प्रकरणाची संपूर्ण माहिती येण्यास सक्षम नसल्याचे येताच वन स्टॉप सेंटर विरोधी समुपदेशक यांच्या मदतीने पिडीतेला विश्वासात घेवून बोलते केले.

पीडीतीने दिलेल्या माहितीवरून आरोपीचे रेखाचित्रकाराच्या मदतीने रेखाचित्र करण्यात आले. शोधमोहिम सुरु करण्यात आली. ७ जून २०२३ रोजी गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मदतीने संशयीत आरोपीस ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे आणून संशयित आरोपीकडे विचारपूस केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई करीता गुन्याच्या तपासणी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चाप पोलिस स्टेशन चामोशी यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल गडचिरोली, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा पोलीस स्टेशन चामोर्शी येथील उल्हास भुसारी, विजयानंद पाटील यांचे नेतृत्व रुपाली पाटील, राहुल आव्हाड, दिपक कुंभारे, पल्लवी चाप, सुधीर साठे पुरुषोत्तम वाटमुरे,दिपक लेनगुरे, सचिन घुबडे,अकबर पोयाम
प्रशांत सरडे,श्रीकृष्ण परचाके, शगीर शेख,मनोहर दोंगरवार, माणिक निसार यांनी पार पाडली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button