जाहिरात
राजकीय

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष गडचिरोली-चिमूर लोकसभा लढणार

BRSP प्रदेश अध्यक्ष विशेष फुठाणे यांची पत्रकार परीषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१९ मार्च)
आगामी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्यापही उमेदवारीवरून खडाजंगी चालू असताना गडचिरोली चिमूर क्षेत्रातील एकही उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. अशावेळी मागील निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष राहिलेला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने गडचिरोली-चिमूर लोकसभा लढविणार असल्याची घोषणा चामोर्शी रोड येथील BRSP कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

भारतीय जनता पक्ष हा भांडवलदार समर्थक व संविधान विरोधी विचार पेरणारा पक्ष असल्याने सत्तेत आल्यास लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरणार आहे त्यामुळे मागील निवडणुकीत आपण महाविकास आघाडीसाठी काम केले व यावेळी सुद्धा करण्याची भूमिका आहे. परंतु महाविकास आघाडी आंबेडकरी मतांचा सन्मान करत नसेल आणि आपल्याच तोऱ्यात असेल तर २० मार्च पर्यंत पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांच्या आदेशानुसार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चर्चेसाठी दार खुले ठेवणार आहे मात्र तस न झाल्यास ताकदीने उमेदवार उतरविणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच शिक्षण, आरोग्य, बेरोजगार, शेतकरी, कामगार व विद्यार्थी मुद्याना घेऊन निवडणुकीत उतरणार असेही सांगण्यात आले.

पक्षाकडे तीन चार उमेदवार असून त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली. यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, BRSP शहर सचिव नागसेन खोब्रागडे, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, कुणाल कोवे, निवृत्त Dysp मारोतराव मडावी, brsp उपाध्यक्ष अरविंद वाळके, निवृत्त ASI शंकर चिंतुरी, महिला आघाडी जिल्हासचिव शहराध्यक्ष शोभा खोब्रागडे, शहराध्यक्ष विद्या कांबळे, संघटक आवळती वाळके, शहर सचिव प्रतिमा करमे, ASI घनश्याम मडावी,सतीश दुर्गमवार, मनोज पेंदाम उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button