राजाराम ते कमलापूर डांबरीकरण रस्त्याची दुरुस्ती करा, संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

लोकशाही न्युज, अहेरी(दि,२१ फेब्रुवारी)
गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम येथील उतरेकडील जाण्याचा मार्ग थेट कमलापूर, रेपणपल्ली ते सिरोंचा जाण्याचा मार्ग असून या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापूर्वी डागडुजी करण्यात आली परंतु काही दिवसातच रस्त्याची वाट लागून मोठ, मोठे खड्डे पडलेले आहेत, मात्र या खड्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष करीत आहेत का, तात्काळ त्या रस्त्याच्या दुरुस्ती करिता पावले उचलावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
राजाराम ते कमलापूर अवघ्या १० किलोमीटर चा अंतर आहे, परंतु या मार्गांवर तारेची कसरत करत प्रवास करावा लागत असतो. आणि मुख्यता म्हणजे कमलापूर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून एकादी गरोदर माता रस्त्यातच डिलिव्हरी होण्याची दाठ शक्यता नाकारता येत नाही.
आणि या रस्त्यावर लहान-लहान गिट्टी बाहेर निघून असून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.अपघात झाल्यावर डांबरीकरण करण्यात येते की, काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
