जाहिरात
आपला जिल्हा

१६ फेब्रुवारी पासून ५ दिवस महासंस्कृती महोत्सव गडचिरोलीत

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ फेब्रुवारी)

गडचिरोलीकरांसाठी ५ दिवस महासंस्कृती महोत्सवांतर्गत भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यलयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हजर होते.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्यावतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ ते २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत एमआयडीसी मैदान कोटगल रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थितीमध्ये अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, रामदास आंबटकर, डॉ. अभिजीत वंजारी, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे यांची उपस्थिती राहणार आहे.

१६ ते २० फेब्रुवारी ला रंगणार खालील कार्यक्रम
¶¶¶
शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी “नक्षत्रांचे देणे’ हा सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सारेगम विनर प्लेबॅक सिगर ऋषिकेश रानडे व फिल्मफेयर अवार्ड विजेत्या गायीका आनंदी जोशी सादर करणार आहेत. १७ फेब्रुवारी रोजी “जागर लोक कलेचा”, दंडार, गोंधळ, रेला नृत्याचे सादरीकरण झाडीपट्टी ग्रुपचे हरीश चंद्रा बोरकर तर मेघा घाडगे व सहकलाकार लावणी सादर करणार आहेत.
१८ फेब्रुवारी रोजी “बिरसा मुंडा यांची जोवनगाथा” या महानाट्याचे सादरीकरण होईल.
१९ फेब्रुवारी रोजी समोर चौगुले आणि सहकान्यासंकडून “हास्य जत्रा” कार्यक्रमाचे तर मंगळवार, दि.२० फेब्रुवारी रोजी कूवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित झाडीपट्टी महानाटकाचे सादरीकरण होणार आहे.

सदर कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button