
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१० फेब्रुवारी)
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंञी एकनाथ शिन्दे यांचा वाढदिवस गडचिरोली जिल्ह्यातील मौजा भगवानपुर येथे रुग्णाना फळे,बिस्कीट , व्रुक्षारोपण,बाईक रँली व अन्य विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला यावेळी भगवानपुर येथे मुख्यमंञी एकनाथ शिन्दे यांचे वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाभरातील शेकडो शिवसैनिक तथा परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी महीला संपर्क प्रमुख वर्षा मोरे यांचे कार्यप्रणालीवर व मुख्यमंञी एकनाथ शिन्दे यांचे कणखर व दमदार नेत्रुत्वावर विश्वास ठेवुन शिवसेना शिन्दे गटात शेकडो महीला,पुरुष व युवकानी पक्ष प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छञपत्ती शिवाजी महाराज ,हिन्दु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे,स्व.आनंद दिघे यांचे प्रतिमेस क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस समोर दिप प्रज्वलन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विधानसभेच्या सभापती नीलम गोरे यांनी सगळ्यांना शुभेच्छा संदेश पाठवून पदाधिकाऱ्यांचा आनंद दिगुनित केला. यावेळी गडचिरोली शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे,मुख्यमंञी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरीता भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, जिल्हा उपाघ्यक्ष राजु कावळे, जिल्हाउपाध्यक्ष अविनाश वरघंटीवार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बारसागडे, तसेच मा.मसराम, शिवसेना महीला जिल्हाध्यक्ष श्रीदेवी वरघंटीवार,जिल्हा उपाध्यक्ष संगीता हर्षे,जेष्ट नाट्य कलावंत शेखर पटले,यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
