कुरखेडा : खोबरामेंढा येथील शिव मंदिराची पुरातत्त्व विभागाने पाहणी करून सर्वांगीण विकास करावा
डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांची मागणी

लोकशाही न्युज, कुरखेडा (दि.१६ मार्च)
कुरखेडा तालुक्याच्या जवळील मालेवाडा पासून दहा किलोमीटर अंतरावर खोबरामेंढा येथे निसर्ग रम्य ठिकाणी वसलेला आहे या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिराच्या दोनशे मीटर अंतरावर तीस ते चाळीस फूट उंचीवर सदर हेमांडपंथी शिवमंदिर आहे आणि सदर शिव मंदिर आजही अज्ञात आहे फक्त आजूबाजूच्या गावातील लोकांना या मंदिराविषयी माहिती आहे आज या ठिकाणाची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली.
सदर विषयाची माहिती संकलित करून रेकॉर्ड तयार केला आणि याविषयी राज्य पुरातत्त्व विभाग यांना कळविण्यात येणार आहे तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली यांना सुद्धा याविषयी माहिती देण्यात येणार आहे सदर मंदिर अतिशय प्राचीन आहे व येथील कोरीव काम व इतर कार्य अतिशय सुंदर आहे परंतु ऊन वारा पावसामुळे वीज पडल्यामुळे सदर मंदिर अतिशय भग्न अवस्थेत आहे व अज्ञात ठिकाणी असेच शेवटची घटका मोजत आहे या ठिकाणी आजूबाजूचे गावातील नागरिक भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी नेहमी येत असतात परंतु या ठिकाणी सोयी सुविधा नसल्याने पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाही त्यामुळे सदर ठिकाणी पर्यटक अथवा भाविक भक्त येत नाही सदर मंदिर हा अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे व या ठिकाणाचा विकास केल्यास येथे हजारो पर्यटक येऊ शकतात व खोबरामेंढातील हा ठिकाण चांगला पर्यटन स्थळ बनू शकतो त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणाची नोंद घ्यावी व पुरातत्त्व विभागाने सुद्धा या मंदिराची चौकशी करून येथील प्राचीनत्वाचा रहस्य उलगडा करावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे, यांनी केले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे,नितेश खुणे, देवानंद पाटील खुणे, रोहन पाटील खुणे दिनेश खुणे व पदाधिकारी उपस्थित होते.
