जाहिरात
राजकीय

जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी ४ सदस्यीय समिती करणार, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे आदेश

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि १८ डिसेंबर)

गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असुन व बांधकाम अतिशय संथ गतीने होत आहे  कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याचा गंभीर आरोप गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या बैठकीत केले असता या सर्व प्रकरणाची चौकशी ४ सदस्य समितीच्या मार्फत करून ८ दिवसाच्या कालावधीत त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी विधानभवनातील झालेल्या बैठकीमध्ये सचिवांना दिले.

आमदार डॉ देवराव होळी यांच्या मागणीवरून गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या निकृष्ट बांधकाम व कंत्राटदाराची निविदा रद्द करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी विधान भवनातील उपसभापती यांच्या दालनामध्ये सदर बैठकीचे आयोजन केले.

१ जून २०२३ पासून दररोज ५ हजार रुपये दंड रक्कम ठोठावूनही कंत्राटदार शासनाच्या कोणत्याही पत्राचे पालन करण्यास प्रतिसाद देत नाही. कंत्राटदाराला फक्त कामे करण्यात व निकृष्ट दर्जाची कामे करण्यात रस असून जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ साठीही त्यांनी अशाच प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या कंत्राटदादाला काळया यादीसाठी नोटीस बजावलेली आहे. त्यातच या कामात कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याची बाब निदर्शनास आली असल्याची माहिती आमदारांनी बैठकीत दिली असता सदर प्रकरणाची चौकशी समिती मार्फत करण्यात यावी असे निर्देश मंत्री यांनी दिले.

आज झालेल्या बैठकीला आमदार डॉ देवराव होळी यांचे सह क्रीडा विभागाचे सचिव, आयुक्त क्रिडा व युवक सेवा पुणे, संचालक क्रीडा व युवक कल्याण, कार्यकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली, वास्तु विशारद क्रीडा संकुल बांधकाम समिती गडचिरोली, जिल्हा क्रीडा संकुलाचे कंत्राटदार यांचे सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button