जाहिरात
भ्रष्टाचार

नियमबाह्य कामाच्या चौकशीसाठी ठिय्या आंदोलन,१० लाखाचे काम २५ लाखात

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,१५ डिसेंम्बर)

ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेची कामास मंजूरी असतांना तसेच शासनाचे कोणतेच आदेश नसताना ही कामे तहसील यंत्रणेमार्फत बांधकाम विभागाद्वारे नियमबाह्यरित्या केली जात आहेत. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याने या नियमबाह्य कामाची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व बडतर्फीची कार्यवाही करण्यात यावी, या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आज,१४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.

(महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत नियमबाह्य कामाचे फलक)

ग्रा. पं. स्तरावर मंजूर रोहयोची कामे ग्रा.पं.च्या मजुरांना रोजगार मिळू नये व कंत्राटदारांकडून लाखोंचा मलिंदा मिळावा, यासाठी तहसील यंत्रणेमार्फत (बांधकाम विभाग) यांच्याकडून केली जात आहेत.नियोजन आराखडा बदलवून स्थानिक मजूरांना काम न देता बांधकाम विभागाकडून कामे केली जात आहेत. एकीकडे ग्रा.पं.ला रोहयाचे कामे करताना ६०/४० च्या कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु बांधकाम विभागाने कोणतेही मातीकाम उपलब्ध करुन देता १०० टक्के कुशल खर्च असणारी कामे बांधकाम विभागाद्वारे कंत्राटदाराकडून केली जातआहे.

शासनाचे कोणतेही पत्र नसतांना बांधकाम विभागाचे दर वापरून अंदाजपत्रक बनविण्यात येत आहेत यासंदर्भात अनेकदा तक्रान करण्यात आली. थेट आयुक्तांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने योगाजी कुडवे यांनी आज, गुरुवारपासून जिल्ह परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. या नियमबाह्य कामाची चौकशी चौकशी होऊ होऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार कुडवे यांनी केला आहे. बेमुदत ठिय्या आंदोलनात योगाजी कुडवे यांचेसह रवींद्र सेलोटे, निळकंठ संदोकर, विलास भानारकर, ईश्वर तिवाडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button