
उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चीचडोह बॅरेजवरून मागील काही महिना भरापासून जनतेच्या मागणीला मान देत पालकमंत्री साहेब यांनी अधिकारी यांचेशी संपर्क करुन बंधाऱ्यावरुन चामोर्शी- मार्कंडा देवस्थानला जाण्या-येण्यास चारचाकी वाहतूक सुरू करण्याचे निर्देश देऊन वाहतुक सुरु करण्यात आले होते. तसेच वाहतुक सुरळीत ठेवुन जिबगांव, लोढोली, साखरी, हरांबा, कढोली, सिर्सी आदि गावाना यांचा फायदा चामोर्शी जाण्यासाठी वेळ व अंतर कमी असल्याने सोईस्कर होत असल्यामुळे सुरळीत झालेली होती. मागील दोन तीन दिवसापासून या वाहतुकीबाबत अनेक बातम्या लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याच्या मार्गावर असुन मार्ग बंद न करता मार्ग सुरु सुरळीत ठेवावे अशी मागणी माजी पं. सं. सभापती निराधार समीती अध्यक्ष राकेश गड्डमवार,काँग्रेस कार्यकर्ते सुनिलजी बोमनवार व्याहाड बुज व माजी उसरपंच दिलीप लटारे, किशोर कारडे, मोहन कुनघाडकर,जित्तु सोनटके,आदी लोंढोली परीसरातील जनतेनी केली आहे सावली तालुक्यातील चिचडोह बरेज हा लोंढोली परिसरातील नागरिकांना चामोर्शी जाणे येणे करीता जवळ होत आहे. चीचडोह मार्ग दुचाकीसाठी पूर्णत बंद झाल्यास चामोर्शी येथे शिकणाऱ्या मुलांच्या शिक्षणावर नुकसान आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांच्या पोटावर पडणार असल्याचे दिसत आहे.
चीचडोह बॅरेज झाल्यामुळे लहानसहान कामाकरीता तसेच बाजारपेठेसाठी तालुक्याच्या ठिकाणी १५-२० किमी जाण्यापेक्षा ७ किमी अंतरावर असणाऱ्या चामोर्शी येथे जात असतात. बॅरेज झाल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त केल्या जात होते.पन आता परीसरातील जनतेची चिंता आणि त्रास वाढत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे परिसरात चीचडोह मार्ग बंद करण्याच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करीत असल्याने जनतेची मागणी लक्षात घेवून मार्ग सुरळीत सुरु करुन जणतेला योग्य प्रवास करीता मार्ग सुरु करण्यात यावी अन्यथा आदोलन करण्यात येईल असा ईशारा निराधार अध्यक्ष माजी प स सभापती राकेश गड्डमवार मागणी काँग्रेस कार्यकर्ते सुनिलजी बोमनवार व्याहाड बुज व माजी उपसरपंच दिलीप लटारे,सरपच कीशोर कारडे कढोली,जित्तु सोनटके,मोहन कुणघाटकर,बोदलकर व लोढोली परिसरातील नागरिकांनी केली आहे.
