जाहिरात
गडचिरोली

महा अंनिस शाखा गडचिरोली तर्फे भुतपूर्व दिवंगत मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना अभिवादन.

Spread the love

गडचिरोली (दि,२८जुलै)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली चे वतीने भुतपूर्व दिवंगत मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महा अंनिस चे जेष्ठ सल्लागार श्री कमलाकर वारके तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे राज्य स्तरीय वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प चे सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, शहर उपाध्यक्ष श्री लहुजी रामटेके उपस्थित होते. श्री विलास निंबोरकर यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या देशभक्तीला नमन करून एक सच्चा देशभक्त कसा असावा याचा सुंदर मिसाल असलेला व्यक्तीमत्व म्हणजे मिसाईल मॅन डॉ अब्दुल कलाम होत. त्यांनी सर्व परिस्थितीवर मात करून यश मिळविले होते. ते खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे आयकान होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात जात पंथ आणि संप्रदाय याला कधीच थारा दिलेला नाही. झाले बहु, होतील बहु, परंतु डॉ अब्दूल कलाम सारखे राष्ट्रपती होतील असे वाटत नाही. श्री लहुजी रामटेके यांनी डॉ कलाम साहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना समाजाने विज्ञानाची कास धरावी तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे मोलाचे मार्गदर्शन केले. श्री कोठारे, श्री कमलाकर वारके यांनी डॉ कलाम यांना अभिवादन करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचलन श्री पुरुषोत्तम चौधरी प्रशिक्षण विभाग कार्यवाह यांनी तर आभारप्रदर्शन श्री शब्बिर शेख शहर अध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री दामोधर ऊप्परवार शहर कार्याध्यक्ष व श्री वामनराव भोयर सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला श्री रघुनाथ बोरकुटे से नि कृषी विस्तार अधिकारी, श्री प्रभाकर भागडकर साहेब, श्री गीरसावळे साहेब व श्री नंदावारजी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button