गडचिरोली नगर रचना विकास अधिकारी कार्यालयातुन बेपत्ता असल्याची चर्चा

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,२१ नोव्हेंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली शहरातील नगर रचना अधिकारी हे बऱ्याच महिन्यापासून कार्यालयामध्ये बसत नसल्याने बेपत्ता असल्याची खमंग चर्चा गडचिरोली शहरात सुरु आहे. लोकशाही न्यूज ने प्रत्यक्ष कार्यालयामध्ये आज पाहणी करण्याकरिता गेले असता कार्यालयात त्या हजर दिसून आलेल्या नाहीत म्हणजेच कार्यालयातून गैहजर होत्या. कार्यालयामध्ये त्याच्या संदर्भात विचारणा केलेली असता तेथील कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावरून कार्यालयात मॅडम कधी कधी येतात तर कधी येतच नाही असा टेप वाजविण्यात आला. आल्याचं तर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा माहीत होतं नाही असे दिसून आले.
नगर विकास कार्यालय गडचिरोली येथील सहाय्यक संचालिका ह्या नागपूर मुक्कामी राहत असून नागपूर वरूनच कार्यालय चालवतात की काय असे दिसून येथे नगर विकास कार्यालय चंद्रपूर प्रभार त्यांच्याकडे असल्याने ते कधी कधीच येतात वर कधी येतही नाही.गडचिरोली तील कार्यालयात कधी आल्याच तर मोठमोठ्या बिल्डर व भुमाफियांच्या फोन केल्यानंतरच त्या कार्यालयात येतात व त्यांचीच कामे करून ते तात्काळ नागपूरला रवाना होतात.
एन ए टी पी च्या नावांवर बिल्डर व भूमाफिया यांच्याकडून अमाप पैसा जमवल्याची खमंग चर्चा सुद्धा गडचिरोली शहरात चालू आहे. नियमात न बसण्याऱ्या जमिनी सुद्धा नगर विकास अधिकारी च्या आशीर्वादाने एन ए टी पी होत असल्याची चर्चा आहे. नियमात न बसणाऱ्या शेतजमिनी जर एन ए टी पी झालेल्या असतील तर त्याविषयी तात्काळ चौकशी करण्यात यावी व अशा कामचुकार, बेजबाबदार अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी.अशी मागणी नगर रचनाकार कार्यालयात आलेल्या गडचिरोली शहरातील अनेक तक्रारकर्त्या नागरिकांनी केलेली आहे.
