एस. पी. एम. महाविद्यालयात ” शिवस्वराज्य दिन ” उत्साहात संपन्न
लोकशाही न्यूज मराठी पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..
चिखली( दि,९ मे) स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळाचे तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर आणि विचारांवर प्रा मनीष पालवे यांनी प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते आणि दूरदृष्टीचे राजे होते त्यांनी मांडलेले विचार आधुनिक काळात सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे आहेत असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथपाल प्रा डॉ प्रदीप बारड उपस्थित होते. शिवस्वराज्य दिनानिमित्त महाविद्यालयातील कु. सरला यंगड, किरण घाडगे, प्रियंका कुमावत, शितल देशमाने, निकिता गायकवाड इत्यादी विद्यार्थिनींनी भाषणे केली. अध्यक्षीय भाषणात ग्रंथपाल प्रदिप बारड यांनी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असा सल्ला दिला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार मंचावर इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ सुरेश माळशिकारे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सुभाष राऊत आणि प्रा विजय वाकोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल देशमाने आणि किरण घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका कुमावत यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
