९ नोव्हेंबर ला ताटीकोंडावर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

लोकशाही न्युज, अहेरी(दि,३ नोव्हेंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्या अंतर्गत रेपनपल्ली येथे विविध समस्याना घेऊन ९ नोव्हेंबर ला संतोष ताठीकोंडावर यांच्या नेतृत्वात सकाळी ७ वाजता राज्य मार्ग चक्काजाम आंदोलन करत असल्याची माहिती दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे. रस्ता बांधकाम होईपर्यंत जळ वाहतूक बंद करावी व जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे तीन वेळेचे पुरावे रद्द करून सरसकट कायम पट्टे देण्यात यावे. जात प्रमाणपत्रासाठी पुरावे नसणाऱ्यांना गृह चौकशी करून जात प्रमाणपत्र देण्यात यावे. छल्लेवाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होईपर्यंत रेपनपल्ली ग्रामपंचायत कार्यालयाला छल्लेवाडा येथे स्थालांतरण करण्यात यावे. सामूहिक वन हक्क जमिनीवर ग्रामसभेचे अधिकार असताना वन विभाग व महसूल विभाग हस्तक्षेप करू नये या व इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनात राजाराम दुर्गे, सुनिल रत्नम, गुलाब देवगडे, वैकुंटम समेया आकुदारी, तिरूपती दुर्गे, सतिश पोरते, निलेश सिडाम, हेमंत सवावत, सुधाकर कांबळे, प्रमोद दुर्गे, प्रकाश दुर्गे, प्रभाकर इरगुलवार, भाऊराव कुंभारे, महेश भगत, महेश मुद्दमवार, संजीव चकनेलवार, नागेश गोडसेलवार, अशोक आकुदारी, भगवान दुर्गे, मनोहर भसारकर आदिनी रास्ता रोको आंदोलन सामील होण्यासाठी आवाहन केले आहे.
