जाहिरात
आपला जिल्हा

२९ ऑक्टोंबर ला तेली समाजाची नियोजन बैठक

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८ ऑक्टोंबर)संपादक:संदिप कांबळे

जिल्ह्याभरात आपल्या विखुरलेल्या तेली समाजाला एकसंघात एक सूत्रात बांधण्यासाठी आणि समाजातील विविध विषयावर चर्चा २२ ऑक्टोबरला पार पडली होती. यामध्ये सर्वानुमते श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव धुमधडाक्यात साजरा करावयाचे असे ठरविण्यात आले होते. याच अनुषंगाने रविवार २९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे रूपरेषा ठरविण्यासाठी नियोजनात्मक बैठकीचे आयोजन सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स गडचिरोली या ठिकाणी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.

तरी समाजातील समाज बांधवांनी तसेच महिला व युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे रूपरेषा ठरविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज उत्सव समिती गडचिरोली यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button