जाहिरात
आपला जिल्हा

२३ व २४ ऑक्टोंबर ला गडचिरोलीत भव्य आदिवासी मेळावा व सांस्कृतिक स्पर्धा

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,२१ ऑक्टोंबर)
संपादक: संदिप कांबळे

येत्या २३ ऑक्टोंबर व २४ ऑक्टोंबर गडचिरोली येथील चांदाडा रोड वरील गोटुल भूमी, महाराजा सेलिब्रेशन लॉन धानोरा रोड येथे भव्य आदिवासी मेळावा, देवी-देवतांचे महापूजा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन होत असल्याची माहिती स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आमदार डॉ.देवराव होळी (गडचिरोली विधानसभा क्षेत्र) नंदू नरोटे (अध्यक्ष गोटूल समिती गडचिरोली) यांनी दिली.

पत्रकार परिषदेला प्रणाली मडावी,य लक्ष्मी कनाके, जयश्री येरमे,(नारी शक्ती संघटना) ज्योत्स्ना येरमे,मयुरी हलामी, विनय सेडमाके, राजेश कोरमी,शिवाणी,संजया गवळी,पूनम हलामी,कांता कुंडली, इत्यादी आदिवासी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

दि,२३ ऑक्टोंबर ला पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर व ग्रामसभाचे सक्षमीकरण व बांबू व्यवस्थापन याविषयी पेसा क्षेत्रातील ग्रामसभा चे अध्यक्ष सचिव व सदस्य यांचे मार्गदर्शन राहणार आहे. मार्गदर्शनात देवाजी तोफा जेष्ठ समाजसेवक, रवींद्र ठाकरे आयएएस अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर, प्रा शाम कोरेटी इतिहास विभागप्रमुख नागपूर विद्यापीठ, प्रा नरेश मडावी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. नरेशचंद्र काठोळे मिशन आयएएस अकॅडमी अमरावती, विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

दुसऱ्या सत्रात दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय आदिवासी व मेळाव्याला सुरुवात होणार आहे आदिवासी मेळाव्याचे उद्घघाटक सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई हे लाभणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदू नरोटे सरसेनापती आविस तथा अध्यक्ष गोटूल समिती गडचिरोली तथा कार्यक्रमाचे आयोजक व सत्कारमूर्ती आमदार डॉ.देवराव होळी गडचिरोली विधानसभा क्षेत्र हे असणार आहेत.

तिसऱ्या सत्रात दुपारी ४ वाजता आदिवासी मधील देव पद्धती ४,५,६,७,११,१२ देव व स्वातंत्र्यसंग्राम मध्ये जनजातीनायकांचा योगदान यावर प्राध्यापक शाम कोरेटी नागपूर विद्यापीठ नागपूर यांचे मार्गदर्शन लागणार आहे. त्याच दिवशी रात्री ७ वाजता आदिवासी संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत व रात्री ११ अंतर झालेल्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण होणार आहे.

दि,२४ ऑक्टोंबर ला सकाळी ११ वाजता आदिवासी देव देवतांची महापूजा खासदार अशोक (गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सह उद्घाटक म्हणून संजय पुराण माजी आमदार देवरी निर्वाचन क्षेत्र व देवाजी तोफा उपाध्यक्ष गोठुल समिती हे असणार आहेत . आदिवासी देवी देवतांचे गोठुलभूमी चांदाळा रोड गडचिरोली येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघटना गडचिरोली पदाधिकारी व कार्यकर्ते, ऑल इंडिया आदिवासी इम्पॉस फेडरेशन गडचिरोली, आदिवासी हलबा- हलबी समाज संघटना गडचिरोली, आदिवासी गोंड गोवारी समाज गडचिरोली, आदिवासी समाज प्रधान संघटना गडचिरोली, आदिवासी कवर समाज संघटना गडचिरोली, बिरसा मुंडा स्मारक समिती, बिरसा सेना व जिल्ह्यातील गोठुल समितीचे पदाधिकारी व सदस्यगण यांचे मोलाचे योगदान राहणार आहे.

सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील आदिवासी जनतेने एकत्र येऊन अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान आमदार डॉ. देवराव होळी व नंदू नरोटे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button