आपला जिल्हा
गुरवळाच्या महिला सरपंच दर्शना भोपये पदावरून पायउतार

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,४ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरवळा येथील सरपंच दर्शना धनराज भोपये यांचे विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावावर तहसीलदारांनी बोलाविलेल्या सभेत मंगळवार (दि. ३) प्रस्तावावर ६ विरुद्ध १ असा संमत झाला. त्यामुळे सरपंच दर्शना भोपये यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पॅनेलने गुरवळा ग्रामपंचायतीवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दर्शना धनराज भोपये या सरपंच झाल्या होत्या. मात्र त्यांना मिळालेल्या संधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी न करता काही कंत्राटदारांशी संगनमताने अनेक विकासकामांत आणि गावातील नागरिकांच्या समस्यांबाबत मनमानी कारभार चालविला होता. त्यामुळे पायउतार व्हावे लागले.
जाहिरात
