नदीत बुडून दोन युवकाचा मृत्यू

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ ऑगष्ट)
संपादक : संदीप कांबळे
गडचिरोली तालुक्यातील खुर्सा (नवेगाव) लगतच्या कठाणी देवटोक घाट नदी परिसरात सात विद्युत कर्मचारी व एक खाजगी कामगार जेवणाची पार्टी करण्याकरिता गेले असता, पोहण्याचा मोह न आवरल्याने खोल पाण्यात अंघोळीला गेले असता त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मृतकाची नावे अनुक्रमे चंद्रकांत वसंत ठाकरे वय २९ राहणार काटली,जि. गडचिरोली, मिलिंद सिताराम चौधरी वय ३३ रा.नेरी ता.चिमूर जि. चन्द्रपूर असे आहे.
महावितरणचे आठ कर्मचारी रविवार दि, २७ ऑगष्ट ला सकाळी ११ वाजता नदी घाटावर जेवणाची पार्टी करायला गेले होते दुपारी ४ नंतर ते पाण्यामध्ये पोहायला गेले पाण्याचा अंदाज न आल्याने मृतक पाण्यामध्ये बुडू लागले घाट खूप खोल असल्याने मृतकांना कुणीही वाचवू शकले नाही सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली व पोलीस स्टेशन ने सदर शोध मोहीम राबवली असता मृतकाचे शव त्यांच्या हाती लागले व मृतकांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आणण्यात आले असून पुढील तपास गडचिरोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार फेगडे हे करीत आहेत.
