आपला जिल्हा
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक ची दुचाकीला धडक ३ ठार

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,२५ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे
सुरजागड येथील लोहखनिजाचे वाहतूक करणाऱ्या
CG-08,AU-9045 या क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले.मृतकाची नावे अनुक्रमे भावना नरेंद्र जनध्यालवार (वय ४५ वर्ष),प्रियंका गणेश जनध्यालवार (वय २४ वर्ष), रुद्र गणेश जनध्यालवार (वय ५ वर्ष) नरेंद्र नरेश जनध्यालवार (वय ५२ वर्ष) हे जखमी असून त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता च्या सुमारास घडली. चामोर्शी या गावात घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. अपघातानंतर चामोर्शी या गावात काही वेळ तणाव पसरला होता. एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा देव ता. चामोर्शी गावावर शोककळा पसरली आहे.
जाहिरात
