जाहिरात
चिखली

झी मराठी ‘मन उडू उडू झालं फेम’ अभिनेत्री ह्त्ता दुर्गुळे येणार,छत्रपती शिवराय प्रतिष्ठाण मानाच्या दहिहंडी सोहळयात मोठया संख्यने सहभागी व्हा – राहुलभाउ बोंद्रे

Spread the love

चिखली | मेघा जाधव
लोकशाही न्यूज पोर्टल
मो. 9529186383
चिखली: 16 ऑगस्ट 2022

श्री छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठाण चिखली, संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या कल्पनेतुन गत 18 वर्ष पूर्वीपासुनच जिल्हायात सर्वप्रथमच दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दरम्यान कोरोना महामारीच्या कावधीत या दहिहंडी उत्सवाला गत दोन वर्षापासून खंड पडला होता. यावर्षी दिनांक 18 ऑगस्ट रोजी चिखली परीसरासह जिल्हायातील तरूणाईचे आकर्षण दहिहंडी उत्सव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात मानकरी ठरलेल्या या दहिहंडी उत्सव सोहळयाला झी मराठी वरील मन उडू उडू झालं या मालीका फेम ह्त्ता दुर्गुळे (दिपीका)

प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाची पूर्व तयारी अंतीम टप्यात आली असुन चिखलीतील दहिहंडी सोहळा युवकांसाठी स्फुर्तीदायक ठरणार असुन परीसरातील गोविंदा पथकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे व आयोजकांनी केलेेे आहे.
चिखली शहराच्या वैभवात भर घालणा-या श्री छत्रपती षिवाजी महाराज चौकात दरसालाबादा प्रमाणे संपन्न होणा-या छत्रपती षिवराय क्रीडा प्रतिष्ठाणच्या या दहिहंडी सोहळयात डी.जे. व ध्वनी प्रक्षेपनाव्दारे हिंदी व मराठी चित्रपटांबरोबरच लोकगितांची मेजवानी पर्वनीच ठरणार आहे. यावेळी बॅनर, पोस्टर, रांगोळी, रोषनाई, हार तु-यांनी परीसराची सजावट करण्यात येणार आहे. दहिहंडी करीता येणा-या गोविंदा पथकांकरीता विविध आकर्षक तथा प्रोत्साहनपर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असुन विविध क्षेत्रातील मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन विषेष उपस्थिीती लाभणार आहे. तर दहिहंडी सोहळयात सहभागी होणा-या गोविंदा पथकांना प्रोत्साहनत्पर बक्षिसे देवून त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
या दहिहंडी सोहळयाला जिल्हयासह परीसरातुन मोठया संख्येने तरूणांनासह नागरीकांनी उपस्थित राहुन सोहळयाचा आनंद लुटावा असे आवाहन श्री छत्रपती षिवराय क्रीडा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यासह प्रतिष्ठाणचे अध्यक्ष साहेबराव पाटील, उपाध्यक्ष सचिन षिंगणे तथा सर्व सदस्य, कुणाल बोंद्रे मित्र मंडळ व तालुका व शहर तथा युवका कॉग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button