मारोडा येथे सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,१० मार्च)
माळी समाज संघटना मारोडा तर्फे आज माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक मंडळाचे कोषाध्यक्ष गिरीधर मोहुरले यांनी केले. त्यांनी आपल्या समाजात बदल घडवायचा असेल तर आपल्या प्रत्येक आई-वडिलांना माता सावित्री व पिता महात्मा फुले यांच्यासारखे संस्कार करावे लागतील असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री विजय सातपुते प्रतिष्ठित नागरिक मारोडा, रोशन कोहळे ग्रामपंचायत सदस्य मारोडा, तसेच समस्त माळी समाज संघटनेचे सदस्य,तथा समस्त गावकरी उपस्थित होते.
आई सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडली. आता फक्त चूल आणि मूल यांत गुंतून न राहता प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देऊन ,योग्य संस्कार देऊन आपल्या समाजासाठी, गावासाठी आणि देशासाठी लढण्याची ताकद आपल्या मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. असे मत ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे यांनी व्यक्त केले.
माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मारोडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम , मुलांवर योग्य संस्कार व्हावे यासाठी आज कार्यशाळेचा सुद्धा आयोजन करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माळी समाज संघटना मारोडा येथील अध्यक्ष अजय चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला आवर्जून गावकरी मंडळी ,माळी समाज संघटनेचे पदाधिकारी तथा प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गावात समाजसेवेचे कार्य सातत्याने सुरू ठेवू असा विश्वास त्यांनी दाखवला.
