जाहिरात
गडचिरोली

लॉयन्स क्लब तर्फे मूक बधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना वस्त्रदान

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,१६ ऑगस्ट)
संपादक: संदिप कांबळे
१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लॉयन्स क्लब गडचिरोली तर्फे मूक बधिर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपूर द्वारा संचालित,मूक-बधिर निवासी शाळा,मुरखळा ता.जि.गडचिरोली येथे निवासी मुला-मुलींना अंडर गारमेंट्स ,टॉवेल, नॅपकिन या दैनंदिन दिनचर्येत अत्यावश्यक वस्त्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी लॉयन्स क्लब गडचिरोली चे अध्यक्ष सतीश पवार,सचिव किशोर चिलमवार,कोषाध्यक्ष लॉ.नितीन चंबूलवार,शांतीलाल सेता,नादिरभाई भामानी,परवीन भामानी,शेषराव येलेकर,संध्या येलेकर,गिरीश कुकडपवार, ममता कुकडपवार,सुनील देशमुख,नीलिमा देशमुख,सुचिता कामडी,संध्या चिलमवार, प्रशांत काळे,बेबी साईशा चिलमवार,लियो रुद्राक्ष काळे,शाळेचे अधीक्षक हाडगुडे सर इतर कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमाला लॉयन्स क्लब गडचिरोली चे सचिव किशोर चिलमवार यांचे अर्थसाह्य लाभले,कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना अल्पोपहार व मिठाई देऊन करण्यात आली.आपल्याला काही तरी मिळाल्याचा आंनद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर व आपण समाजासाठी काही तरी चांगलं करू शकतो याचा आंनद लॉयन्स सदस्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येत होता,कार्यक्रमाचे संचालन संध्या चिलमवार यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button