देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात होत असलेल्या पाण्याच्या टंचाई वर तोडगा काढा,
देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात राजेंद्र वार्ड येथील इकराम पठाण यांच्या घरा समोरील बोरवेल पंप चि दुरुस्ती करा-समाजवादी पक्षाने दिले निवेदन
शुभम खरवडे
(वडसा शहर प्रतिनिधि)
देसाईगंज-
देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात शहरातील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्ड, जवाहर वार्ड, किडवाई वार्ड, कन्नमवार वार्ड या ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहें शहरातील हनुमान वार्ड या ठिकानि चक्क दररोज ट्यान्कर नें पाणी पुरवठा सुरू आहें तर जवाहर वार्ड या ठिकाणी ठरवलेल्या वेळेत नळात पाणी कमी येत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहें तसेच राजेन्द्र वार्ड येथील इकराम खान पठान (इक्कू) यांच्या घरा सोमोरिल बोरिंग पंप मागील 2 वर्षापासून बंद पडले आहें या मुळे येथील जनतेस पाण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहें स्थानिक नागरिकांनी सदर बोरिंग वर नगर पालिके कडून इकराम पठाण यास दुरुस्ती चि मेंटेनन्स चि जबाबदारी दिलेली होती यास स्थानिकांन द्वारे वारंवार दुरुस्ती बद्दल विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर देत असल्याची नाराजगी येथील रहिवाशी नागरिकांचीआहें सदर बोर्वेल चि जनतेची अडचण समझून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी आणि देसाईगंज शहरात पाण्याच्या प्रश्नाला घेऊन उद्भवलेल्या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यात यावा अन्यथा समाजवादी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची अशी मागणी आणि मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा समाजवादी पक्षाच्या वतीने मा मुख्याधिकारी यांना दिलेल्या नीवेदनातुन देण्यात आला आहें निवेदन देतांना जिल्हा कार्यकारिणीत सदस्य सपना ताई आत्राम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अल्पसंख्यक विभाग मुजीब शेख,देसाईगंज तालुका अध्यक्ष खेमराज नेवारे, देसाईगंज शहर अध्यक्ष नरेश वासनिक, देसाईगंज तालुका सचिव जीब्राइल शेख,तालुका अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग अस्लम शेख आदी समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते….
…
