जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

दूषित पाणी पिल्याने अनेकांची प्रकृती खराब इलाजासाठी गाठले नागपूर व चंद्रपूर चे हॉस्पिटल

Spread the love

  गडचिरोली (दि,१४ जून)
गडचिरोली शहरात मागील शुक्रवारला पाण्याच्या पाईप लाईन मध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्या त्या दिवसापासून शहरात अनेक लोकांना उलट्या-जुलाब व नानाविध रोगांनी ग्रासले आहे. नगर परिषद गडचिरोली च्या गलथान कारभारामुळे अर्ध्या शहरात या दूषित पाण्याचा पुरवठा झाला व तो दूषित पाणी अर्ध्या शहरातील जनतेने पिला यात कुठलाही संभ्रम नाही.
मागील पाच वर्षे नगर परिषद वर सत्ता गाजवणाऱ्या भाजपा च्या गडचिरोली शहरातील नामवंत कार्यकर्त्यांच्या घरी असाच प्रकार घडला त्या घरातील गृहिणीला चार दिवसापासून सतत उलट्या हगवण सारख्या बिमारी ला सामोरे जावे लागले पण त्या गृहिणीने गडचिरोली शहरात कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता सरळ नागपूर सारख्या बड्या शहरात इलाज करणे पसंत केले, गडचिरोलीत जर का इलाज केला असता तर इतरांना कुणकुण लागली असती व दूषित पाणी पिल्याने हा प्रकार झाला हे उघड झाले
असते .त्यामुळे सदर गृहिणीने इलाजासाठी नागपूर गाठले.
त्याचप्रमाणे नगर परिषदेतील कर्मचारी यांच्या घरी पण असाच काहीसा प्रकार घडला त्या गृहिणीने गडचिरोलीच्या डॉक्टरांचा सल्ला न घेता चंद्रपुर गाठले व इलाज सुरू आहेत व सद्या त्या गृहिणीची तबेत बरी असल्याची माहिती आहे .
शहरातील पाणीपुरवठा सुरू …..
मागील चार दिवसांपासून खंडित पाणीपुरवठा आज सुरू झाला पण घरातील गृहिणीने नळाच्या पाण्याच्या ऐवजी पिण्याच्या पाण्यासाठी (चिल्ड वॉटर कॅन) च्या पाण्याला अधिक पसंती दिली नळाला आलेला पाणी हा केवळ बाहेरच्या (धुणी,भांडी) वापरासाठीच वापरण्यात आला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button