जाहिरात
भ्रष्टाचार

७ हजार रुपयांची मागणी करणारा भूमी अभिलेख कार्यालय भूकरमापका विरुद्ध गुन्ह्याची नोंद

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली /आरमोरी (दि,२७ जून)

तक्रारदार यांना त्यांच्या वडीलोपार्जीत शेत जमीनीच्या पोट हिस्साची मोजणी करुन त्यातील एक हेक्टर जमीन मॅचअप करून “क” शिट तयार करुन देण्याचे कामाकरीता आरोपी श्री. खुशाल मुखरु राखडे, भुकरमापक, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय आरमोरी यांनी ७,००० रुपयांची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केल्यावरुन पोलीस स्टेशन आरमोरी येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात शिवाजी राठोड, श्रीधर भोसले, नथ्थु धोटे, राजु पदमगिरीवार, किशोर जौंजारकर, स्वप्निल बांबोळे, किशोर ठाकुर, संदिप उडाण, संदीप घोरमोडे,
अनिल अंगडवार यांनी पार पाडली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button