जाहिरात
ताज्या घडामोडी

नक्षल पोलिसाच्या चकमकीत दोन ठार, शस्त्रसाठा जप्त

Spread the love

लोकशाही न्युज,धानोरा (दि,१४ डिसेंम्बर)

धानोरा तालुक्यातील गोडलवाही पोलीस स्टेशन पासून १० किमी अंतरावर छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलीस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासीना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे सदर परिसरात शोध मोहीम राबवून कारवाई करण्यात पोलीस दलाला मोठे यश आले.

पोलीस दल परिसरात शोध घेत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला ज्याला पोलीस दलाने प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास गोळीबार सुरू होता. त्यानंतर परिसरात झडती घेतली त्यावेळी एक AK47 आणि एक SLR शस्त्र सह दोन पुरुष माओवादी यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी एकाची प्राथमिक ओळख म्हणजे कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी, जो 2019 मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता ज्यात गडचिरोली पोलिसांचे 15 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. पुढील ऑपरेशन्स आणि परिसराचा शोध सुरू आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button