जाहिरात
भामरागड

खा. अशोक नेते यांनी घेतला पुर परिस्थितीचा आढावा.

Spread the love

भामरागड (दिं.१९ऑगस्ट )

भामरागडला सातत्याने पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे पंचनामे करून पुराने विस्थापित होणारे व्यावसायिक व बेघर होणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसन व पर्यायी जागे बद्दल तातळीने पाठपुरावा करून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावे असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.


(खा. अशोक नेते आढावा बैठक घेताना)

उपविभागीय अधिकारी भामरागड येथे अधिकाऱ्यांनसमेत पूर परिस्थितीचा घेतला आढावा. गडचिरोली जिल्हयात मुसळधार पाऊस पडल्याने भामरागड,अहेरी व सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद होते. याच पार्श्वभूमीवर खा.अशोकजी नेते यांनी तातडीने भामरागड दौरा काढले.मात्र रस्ते मार्गाची पाहणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी भामरागड येथे आढावा बैठक घेतले.
प्रश्नांवर वरिष्ट अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले .
प्रत्यक्ष पूर परिस्थिती आढावा घेण्यात आला.त्यानंतर बैठकीमधे पूर बाधितांचा सर्वे करुन तातडीने मदत करावी,व पंचनामे सुरु करावे,
प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून काम करावे.व आपत्तीला सामोरे साठी सज्ज रहावे, असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले.


(या आढावा बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते)
याप्रसंगी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रविंद्रजी औलालवार संघटन जि. महामंत्री,विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष,सुनिल विशवास ता.अध्यक्ष, सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष,धनंजय पडशाल,उपस्थित होते .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button