जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

९ जुलै ला तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली(दि,१७ जून)
संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे १० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम ९ जुलै २०२३ रोज रविवारला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
दहावीत ८० टक्के तर बारावी कला, विज्ञान व कॉमर्स शाखेत ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे तसेच आचार्य पदवी, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार प्रमाणपत्र, शिल्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
तरी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत दि.३० जून २०२३ पर्यंत खालील संताजी मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडे जमा करावे. प्रा. देवानंद कामडी, गोपीनाथ चांदेवार, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, अनिल बालपांडे, प्रभाकर वासेकर, राजेश इटनकर, सुधाकर दूधबावरे, सुधाकर लाकडे, रामराज कडकडे, भाऊराव कुंभारकर, महादेव वाघे, विठ्ठलराव कोठारे, मदनकर सर यांच्याकडे जमा करावे असे आवाहन संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button