जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

२० ऑक्टोंबर पासून जिल्हाभरातील रुग्णालयातील कंत्राटी काम स्वच्छक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१८ ऑक्टोंबर)

आरोग्य विभागातील वेगवेगळ्या संवर्गात एमविजी कंपनी नाशिक व ओझोन कंपनी चंद्रपूर या कंपनी अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दोनशे पेक्षा अधिक कंत्राटी काम स्वच्छ म्हणून कार्यरत आहेत.

पण कंपनीमार्फत किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार दिवसाचे आठ तास काम करून सुद्धा कंत्राटदाराकडून पुरेसे वेतन व इत्तर भत्ते मिळत नसल्याने रुग्णालयातील स्वच्छक कर्मचाऱ्यांनी २० ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन करण्याचे ठरविले आहे.

काम बंद आंदोलन २० ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजतापासून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय गडचिरोली येथे जिल्हाभरातील स्वच्छ कंत्राटी कर्मचारी एकत्र येऊन करणार असल्याची माहिती आज (दि. १८ऑक्टोबर) रोजी स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला बाळू टेंभुर्णे पूर्व विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी, जी.के.बारसिंगे, सुरज हजारे, नितेश जुमनाके, साक्षी मडावी यांचेसह कंत्राटी स्वच्छक हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button