जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली: डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार अशोक नेते याचे शुभ हस्ते पार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,५ नोव्हेंबर)

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), आणि पी. रि. पा. यांच्या महायुतीच्या ६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. माजी खासदार व भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी अशोक नेते यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत म्हटले की, “निवडणुकीत मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींना उत्तर देण्यासाठी हे कार्यालय केंद्रबिंदू ठरेल.” त्यांनी पुढे नमूद केले की, “आजच्या या उद्घाटनाने निवडणुकीच्या दृष्टीने एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. महायुतीच्या विजयी मोहिमेची सुरुवात येथेच होत आहे.

कार्यक्रमात अशोक नेते यांनी मुख्यमंत्री “लाडकी बहीण” योजनेचा उल्लेख करत, राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजना कशा महत्त्वाच्या आहेत, यावर भर दिला. “महिला, शेतकरी आणि युवकांच्या कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले. यावेळी विरोधकांच्या योजनांविरोधातील भूमिकेवरही त्यांनी टीका केली.

उद्घाटन सोहळ्यात मंचावर उपस्थित मान्यवर माजी खासदार अशोक नेते, महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, शिवसेना नेते हेमंतज जम्बेवार, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे,भाजपा नेत्या डॉ. चंदा कोडवते, शिवसेनेचे नेते राजु कावडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे आणि शिवसेनेच्या नेत्या नीता वडेट्टीवार,अविनाश वरघंटे, दिपक बारसागडे यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असताना, प्रचार मोहिमेच्या या जनसंपर्क कार्यालयाने कार्यकर्त्यांना नवा जोम दिला असून, आगामी निवडणुकीत डॉ. मिलिंद नरोटे यांना विजय मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button