गडचिरोली : विदर्भ पोदार इंटरनॅशनल स्कूल ने अडवली विद्यार्थ्यांची टीसी
पालकाची पत्रकार परिषद

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ६ ऑगस्ट)
गडचिरोली शहरात नावाजलेल्या विदर्भ पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे योगेश्वर डोंगरवार यांची पाल्य अनुक्रमे नियोग व अन्वी हि मागील वर्षी वर्ग २ व वर्ग ५ मध्ये शिक्षण घेत होती. पालकांनी चालू शैक्षणिक वर्षात आपल्या मुलांना एप्रिल २०२५ पासुन शाळेत पाठविले नाही.
पुढील शिक्षणासाठी पालकाने २१ जुलै २०२५ ला टीसी मिळावी याकरिता अर्ज दिला त्यावेळी विदर्भ पोदार इंटरनॅशनल स्कूल कडून त्यांना अतिरिक्त १० हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. पालक योगेश्वर डोंगरवार यांनी लिखित पत्र मागितले असता त्यांना शाळेकडुन उडवाउडवी ची उत्तर देण्यात आली.
सदर घटनेची तक्रार योगेश्वर डोंगरवार यांनी विदर्भ पोदार इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली यांच्या विरोधात माध्यम शिक्षणाधिकारी गडचिरोली व जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे कडे लेखी तक्रार करून सुद्धा आज पर्यंत त्या विद्यार्थ्यांना टीसी देण्यात आलेली नाही त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जाण्याची पाळी येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेतून टीसी न दिल्यामुळे विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित आहेत टीसी न देणाऱ्या मुख्याध्यापिका यांचेवर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पालक डोंगरवार यांनी केली आहे.
श्रीमती निहारिका मंदरे
मुख्याध्यापिका, विदर्भ पोदार इंटरनॅशनल स्कूल
!!!
प्रेस क्लब येथून मुख्याध्यापिका यांना टीसी संदर्भात प्रतिक्रियेसाठी फोन केला असता प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.
