जाहिरात
क्राईमचिखली

निष्पाप राधिकेचा हत्यारा सापडला, पूजेचे सामान विकणाराच निघाला हत्यारा

आधी अत्याचार केला मग गळा आवळून खून

Spread the love

लोकशाही न्युज, चिखली (दि,१७ मे) प्रतिनिधी : मेघा जाधव

चिखली – संपूर्ण जिल्हाच नव्हे तर अख्खे महाराष्ट्र राज्य हादरवून सोडणाऱ्या तपोवन देवी संस्थान येथील हत्यांकांड प्रकरणात पोलिसांनी मारेकऱ्याला शोधून काढलेच. कोणतेही पुरावे मारेकऱ्याने मागे सोडले नव्हते,मात्र गुन्हेगार कितीही अट्टल असला तरी आपण त्यापेक्षा १० पाऊले पुढे आहोत हे सिद्ध केले आहे.

रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विकणाऱ्या सदानंद भगवान रोडगे (२६, रा रोहडा, ता चिखली) या नराधमाने ६ वर्षीय चिमुकलीचा बळी घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले. संशयित म्हणून पोलिसांनी आधीच त्याला ताब्यात घेतले होते, आधी “मी तो नव्हेच” अशी भूमिका घेणाऱ्या सदानंदला पोलिसांनी दाखवून दिलं की पोलिस पोलीसच असतात. अन् त्यानंतर मात्र तो पोपटासारखा बोलू लागला. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार या प्रकरणाच्या तपासासाठी तब्बल ६ दिवस अंढेरा पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर या अधिकाऱ्यांनी तपासकार्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरातून हरवलेल्या ६ वर्षीय राधिका विलास इंगळे हिचा मृतदेह तपोवन मंदिर परिसरातील मागील भागात १३ मे रोजी आढळून आला होता. बाळापूर येथील मूळ निवासी असलेले विलास इंगळे आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखली परिसरात आले होते. राधिका मंदिर परिसरात खेळत असतांना सदर युवकाने तिला पोंग्याचे आमिष दाखवून बाजूच्या डोंगरातील ओढ्याजवळ घेऊन गेला, अत्याचार केला आणि बोंब होऊ नये म्हणून तिचा गळा आवळून खून केला. सकाळी ११ वाजेपासून कु. राधिका कुणालाच दिसली नव्हती. तिचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता. बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राधिकाचा शोध घेणे सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान तपोवन देवीच्या मंदिर परिसरातील मागील भागात राधिकेचा मृतदेह आढळून आला होता. चेहरा पूर्णपणे ठेचण्यात आलेला आहे. मंदिराच्या मागील परिसर डोंगराळ असून ५०० मीटर अंतरावर राधिकाचा मृतदेह सापडला. दुपारी जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी संपूर्ण मंदिर परिसराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा राधिका आढळून आली पण तिच्यात जीव नव्हता. तिची हत्या कोणी केली आणि कशासाठी केली? हा एकच प्रश्न अनेकांचे डोळे पाणावणारा होता. पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून युद्धस्तरावर तपास सुरु केला होता. अनेकांची चौकशी झाली होती. काही क्लू पोलिसांना मिळाले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, डीवायएसपी श्री यामावार, एलसीबीचे प्रमुख पीआय अशोक लांडे, अंढेरा ठाणेदार श्री हिवरकर यांच्यासह विविध पोलीस कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन घटनेचा छडा लावला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button