जाहिरात
निधन वार्ता

निधन वार्ता… दिपक बोलीवार यांचे निधन : डोंगरगाव येथे होणार अंत्यसंस्कार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१४ एप्रिल)

गडचिरोली मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथील दिपक पुरूषोत्तम बोलीवार (वय ३५ वर्षे) यांचे आज सकाळी ६:०० वाजता दत्ता मेघे सावंगी हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने बोलीवार परिवारावर दु:खाचे सावट कोसळले असून डोंगरगाव (मारकबोडी स्मशान घाट ) येथे सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सत्यशोधक न्युज 24 तास न्युज पोर्टल व युटुब चायनल चे ते संपादक होते. गडचिरोली होमगार्ड म्हणून ते कार्यरत होते .
मागील सहा महिन्यांपासून कॅन्सर या दुर्धर आजाराशी ते झुंज देत होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुली, आई ,वडील व आप्त स्वकीय परिवार आहे.

लोकशाही न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली…

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button