प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने १४ एप्रिलला योगाजी कुडवे व आंदोलनकर्ते करणार आत्मदहन
पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि,१० एप्रिल)
२७ मार्च पासून जिल्हा परिषद गडचिरोली समोर योगाजी कुडवे व काही आंदोलनकर्ते गडचिरोली जिल्यातील भामरागड, मुलचेरा व अहेरी तालुक्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करत आहेत पण अजूनही प्रशासनाने आंदोलनाची कुठलीही दखल न घेतल्याने १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आत्मदहन करणार अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यात करोडो रुपयांचे बोगस कामे व काम न करता पैशाची उचल केली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद याने सहा सदस्य समिती गठित केली चौकशी समितीने प्रत्यक्ष कामावर जाऊन चौकशी केली व त्यात २३ अधिकारी, कर्मचारी दोषी असल्याचा अहवाल दिला असल्याने संबंधित दोषीवर कारवाई करणार की नाही असा सवाल आंदोलनकर्त्यांनी याप्रसंगी केला आहे.
११ एप्रिल ला करणार मुंडन आंदोलन,१२ एप्रिल ला करणार भिक मांगो आंदोलन,१३ एप्रिल ला करणार घंटानाद आंदोलन व १४ एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनाचे औचित्य साधून योगाजी कुडवे व आंदोलन कर्त्यांनी आत्मदहन करणार अशी माहिती पत्रकार परिषदेत योगाजी कुडवे व नीलकंठ संदोकर पोर्ला, धनंजय डोईजड कुरखेडा, चंद्रशेखर रायसिडाम सावरगाव, माधव निकुरे पोर्ला, रवींद्र सेलोटे पोर्ला यांची उपस्थिती होती .
(पत्रकार परिषदेत माहिती देताना योगजी कुडवे)
