जाहिरात
आपला जिल्हाभ्रष्टाचार

दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, योगाजी कुडवे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ मार्च)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जोपर्यंत गुन्ह्याची नोंद होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही अशी माहिती जिल्हा परिषद समोर असलेल्या आंदोलन स्थळी पत्रकार परिषद घेऊन योगाजी कुडवे यांनी माहिती दिली.

(पत्रकार परिषदेत माहिती देताना योगाजी कुडवे सामाजिक कार्यकर्ता)

दि,२७ मार्च रोजी सुरू झालेल्या आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. प्रशासनाने सदर आंदोलनाची अजून पर्यंत दखल घेतलेले नाही मनरेगाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने तालुका भामरागड, अहेरी, मुलचेरा, येथील २ डझनभर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही.

या भ्रष्टाचार प्रकरणी गठीत केल्या समितीने ८४ कामांपैकी ८ कामाची तपासणी केली असता,काही कामे ४०%,काही कामे ५०% केलेली असून सदर कामाचे देयके काढलेली आहे,त्यामुळे सदर झालेल्या कामावरील भ्रष्टाचार हा खूप मोठा आहे असे दिसून येते.
काही कामात तर १३० मीटर ची लांबी ची कामे करून २०४ मिटर ची देयके सुद्धा काढल्या गेल्याची माहिती पत्रकार परिषदेत  दिली.

भामरागड पंचायत समितीतील १६ दोषी अधिकारी, कर्मचारी,

१,गटविकास अधिकारी २,विस्तार अधिकारी ३,शाखा अभियंता ४,नरेगा तांत्रिक अधीकारी (t p o)              बोठनफुंडी ग्रामपंचायत सचिव,इरुपडुमे ग्रामपंचायत सचिव,मडवेली ग्रामपंचायत सचिव,मनेराजराम ग्रामपंचायत सचिव, येचली ग्रामपंचायत सचिव

अहेरी पंचायत समितीत ५ दोषी अधिकारी, कर्मचारी,

१,गटविकास अधिकारी २,विस्तार अधिकारी ३,शाखा अभियंता ४,नरेगा तांत्रिक अधिकारी ५, उमानुर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक

मूलचेरा पंचायत समितीत ८ दोषी अधिकारी कर्मचारी,

१,गटविकास अधिकारी २,विस्तार अधिकारी ३,शाखा अभियंता ४,नरेगा तांत्रिक अधिकारी ५,विवेकानंदपूर ग्रामपंचायत सचिव ६, सुंदर नगर ग्रामपंचायत सचिव ७,शांती ग्राम पंचायत सचिव ८,येला ग्रामपंचायतचे सचिव यांचेवर अजूनही कारवाई नाही .

आंदोलन कर्त्याचे दोषी अधिकारी, कर्मचारी यांचेवर होणाऱ्या कारवाईकडे लक्ष, पत्रकार परिषदेला आंदोलन स्थळी नीलकंठ संदोकर पोरला, धनंजय डोईजड गडचिरोली, रवींद्र सेलोटे पोरला, आकाश मठ्ठामी एट्टापल्ली, चंद्रशेखर सिडाम सावरगाव यांची हजेरी होती .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button