जाहिरात
आपला जिल्हा

वीज पडून शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,१९ मार्च)

गडचिरोली जिल्ह्यात दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता चामोर्शी तालुक्यामध्ये तलाठी साजा क्रमांक १ नवेगाव रै मध्ये अंतर्भूत गाव मौजा मालेरचक मंडळ कुनघाडा येथील कु, स्वीटी बंडू सोमनकर वय १६ वर्षं इयत्ता ९ वी तील विद्यार्थीनीं ही शाळेतून परत येत असतांना वीज कोसडून गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले असता मृत्यू पावली आहे.

स्वीटी ही कुनघाळा येथील विश्व शांती विद्यालय येथे इयत्ता ९ व्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर आपल्या मैत्रिणीसह ती आपल्या गावाला जात होती, तिच्या मृत्यूने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button