जाहिरात
क्रीडा

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली च्या विद्यार्थीनीनी नाशिक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मिळवले यश

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (२१ फेब्रुवारी)

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील मुला मुलींच्या नाशिक येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथील विद्यार्थीनी कु. खुशबु आतला या विद्यार्थीनीने लांब उडी खेळामध्ये सुवर्ण पदक, कु. संध्या उसेंडी विद्यार्थीनीने गोळाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक, कु. हर्षदा उसेंडी विद्यार्थीनीने व्हॉलीबॉल खेळामध्ये रौप्य पदक व कु. अनुष्का शामराव पुडो विद्यार्थीनीने ३००० मिटर चालने या खेळप्रकारात कास्य पदक पटकाविला.

सदर ४ विद्यार्थीनींचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. विद्यार्थीनींनी यशाचे श्रेय मुख्याध्यापिका कु. दिपा जुमनाके व क्रीडा शिक्षक श्री. आशिष नंदनवार यांना दिले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सदर खेळाडु विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button