चिखली : श्री.शिवाजी विज्ञान आणि कला महाविद्यालयात फाईन आर्ट्स स्पर्धा संपन्न

लोकशाही न्युज, चिखली (दि. ४ डिसेंबर)
चिखली प्रतिनिधी/मेघा जाधव
स्थानिक चिखली येथील श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री.शिवाजी विज्ञान आणि कला महाविद्यालयात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती निमित्त फाईन आर्ट्स स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात केले गेले होते.दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन श्री.यशवंत खाकरे,कलाशिक्षक श्री.शिवाजी माध्यमिक शाळा,चिखली यांच्या हस्ते करण्यात आले.श्री.प्रशांत राठोड,कलाशिक्षक श्री.शिवाजी आश्रम शाळा,हे प्रमुख अतिथी आणि स्पर्धेचे पंच म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.प्रमोद आर.पडोळे हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांची स्तुती केली.तसेच स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा.डॉ.वनिता पोच्छी यांनी व्यक्तिमत्व विकासात फाईन आर्टचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री.यशवंत खाकरे सरांनी अर्थार्जनासाठी क्ले मॉडेलिंग, कोलाज मेकिंगचे महत्व काय यावर सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ.विजयश्री हेमके याची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.
महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा हा या स्पर्धा आयोजना मागील मुख्य हेतू होता.या स्पर्धेत कोलाज मेकिंग,क्ले मोडेलिंग आणि कार्टून चित्र रेखाटन स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या कलाकृती वेळेवर विषय देऊन तयार करून प्रदर्शनात ठेवलेल्या होत्या.ही स्पर्धा विविधांगी विषयावर आयोजित केल्या गेली होती.कार्टून ड्रॉईंगसाठी १.सेव्ह द अर्थ २.महिलांची सामाजिक स्थिती ३.स्पेस अॅडव्हेंचर ४.सुपर हिरो ५.अंडर वॉटर वर्ल्ड हे विषय ठेवण्यात आलेले होते.तर कोलाज मेकिंगसाठी १.डॉ.पंजाबराव देशमुख ऊर्फ भाऊसाहेबांचे विविध क्षेत्रातील कार्य २.सेव्ह द अर्थ ३.महिलांची सामाजिक स्थिती ४.स्पेस अॅडव्हेंचर ५.पोर्ट्रेट कोलाज आर्ट ६.सुपर हिरो ७.अंडर वॉटर वर्ल्ड ८.तुमचा आवडता पक्षी/ प्राणी हे ठेवण्यात आलेले होते.तसेच क्ले मॉडेलिंग साठी १.आपले आवडते कार्टून २.गणपती ३.तुमच्या मनातील महापुरुष ४.तुमचा आवडता प्राणी इत्यादी विषय ठेवण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.फाईन आर्ट समितीच्या प्रमुख डॉ.एम ई जाधव,सदस्य प्रा.प्रियंका चव्हाण,प्रा.पवन बनसोडे,प्रा. विनय इंगोले,डॉ.मनोज सोनूने,प्रा.वैभव वाघमारे हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रियंका चव्हाण यांनी केले.तर आभार डॉ.मनोज सोनोने यांनी केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील श्री. उन्हाळे सर (ज्युनिअर चे इन्चार्ज),श्री.विनोद सपकाळ तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.
