लोकशाही न्यूज गडचिरोली (दि,७ जानेवारी )
गडचिरोली शहरातील स्थानिक धानोरा रोड वरील ग्रामसेवक भवनात पार पडला मेळावा.
कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई पूर्व प्रांताध्यक्ष प्रा. महेश पानसे, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गडचिरोली जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक भास्कर चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे, जेष्ठ पत्रकार तथा D वाईस न्यूज पोर्टलचे संपादक रोहिदास राऊत, माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तुळशीरामजी जांभुळकर, डिजिटल डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, एस.न्यूज.संपादक सुरज बोम्मावार, चांदा ब्लास्ट उपसंपादक आशिष रैच, खरे वृत्तांत न्यूज पोर्टल संपादक मोरेश्वर उद्योजवार, एस.के. २४ तास न्यूज संपादक सुरेश कन्नमवार तर सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र मत न्यूज २४ तास पोर्टल चे संपादक खोमदेवजी तुम्मेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण रूपराज वाकोडे यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर प्रमुख मंडळींनी उपस्थित पत्रकारांना मौलिक व योग्य मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई पूर्व प्रांताध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी आजच्या डिजिटल पत्रकारीतेत विश्वासर्हता जिंकण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती म्हणून महाराष्ट्र मत न्यूज २४ तास पोर्टल चे संपादक खोमदेवजी तुम्मेवार यांना कोरोना काळात भरीव कामगिरी करणारे व गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप सुद्धा करणारे व मायलेकीची भेट घडवुन आणणारे व अनेक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शाल श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सदर परिचय मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .

(ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना मार्गदर्शन प्रसंगी)
लोकशाही न्युज पोर्टल चे संपादक संदिप कांबळे, विचार क्रांती न्युज पोर्टलचे संपादक बाळू मशाखेत्री, महाभारत न्यूज पोर्टलचे संपादक उदय धकाते, राईट टाईम न्युज चैनल चे संपादक राजू सहारे, लोक प्रवाह न्यूज चैनल चे संपादक किशोर खेवले, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रमुख व्यंकटेश दुडमवार युवा मराठा चे जिल्हा प्रतिनिधी सुरज गुंडमवार व अनेक ग्रामीण भागातील पत्रकार सुद्धा याप्रसंगी हजर होते यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता हातभार लावला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन The गडविश्व न्यूज चे संपादक सचिन जिवतोडे यांनी केले आहे. तर आभार लोकवृत न्युज चे संपादक निलेश सातपुते यांनी मानले. .
