जाहिरात
राजकीय

२३ ऑगस्ट ला चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष जनसंवाद यात्रेकरिता गडचिरोलीत

खासदार अशोक नेते यांची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली(दि,२१ ऑगष्ट)
संपादक:संदिप कांबळे

सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे २३ ऑगस्टला गडचिरोली येणार असल्याची माहिती स्थानिक सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेतुन खासदार अशोक नेते (गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र) यांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सकाळी १०:३० वाजता गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे आगमन करणार आहेत. व त्यांच्या सोबत पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम हे हजर राहणार आहेत. तिथे त्यांचे ढोल, ताशा, च्या गजराने व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर ते सर्किट हाऊस ला जातील व चहा नाश्ता आटोपून ते शहरातील त्रिमूर्ती चौकातून घिसुलाल काबरा यांच्या घरापर्यंत पायदळी चालून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर सुमानंद सभागृहात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित करून तीनही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर ते खासदार अशोक नेते नेते यांच्या वाररूमचे व ड्रायव्हिंग स्कूलचे सुद्धा उद्घाटन करणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या कार्यक्रमाला शहरातील प्रदेशाध्यक्ष यांच्या कार्यक्रमाला शहरातील व लोकसभा क्षेत्रातील जनतेने उपस्थित रहावे असे आव्हान सुद्धा खासदार अशोक नेते यांनी याप्रसंगी केले आहे

या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे,लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,जेष्ठ नेते रमेश भुरसे,युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे,किसान आघाडीचे तथा कृ.उ.बा.स. संचालक रमेश बारसागडे,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,अनिल कुनघाडकर माजी उपाध्यक्ष नगर परिषद गडचिरोली, विनोद देओजवार, संजिव सरकार,केशव निंबोड, भास्कर भुरे,विलास नैताम आदी कार्यकर्त्यांची हजेरी होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button