सामदा( बुज) येथे” भगवान बिरसा मुंडा “जयंती मोठ्या थाटामाटात साजरी
लोकशाही न्यूज
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड सर्कल प्रतिनिधी
सावली तालुक्यातील सामदा बूज येथे” आदिवासी समाजाच्या” वतीने मंगळवार दि.15/11/2022 रोजी “भगवान बिरसा मुंडा”यांची जयंतीनिमित्त विविध संस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 9: 00 वाजता “भगवान बिरसा मुंडा’ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आदिवासी समाजाचे अध्यक्ष श्री . मुकरुजी गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातआले. कार्यक्रमाला विशेष अतिथी सौ. शुभांगी मडावी सरपंच ग्रा. पं सामदा बूज, श्री. नितेश जुवारे उपसरपंच ग्रा. पं सामदा, पुण्यप्रेडीवार पोलीस पाटील ,श्री. बुरले त. मु सं अध्यक्ष, श्री.विनायक कोसनकर त मू स सचिव , श्री.विनोद पा.भांडेकर मा.उप सरपंच ग्रा.प सामदा बूज, श्री.रवी बांबोळे अध्यक्ष बौध्द समाज सामदा बूज आणि सर्व आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
नंतर थोड्याच वेळात गोंडी संस्कृती वरील आधारित गोंडी नृत्य सादर करण्यात आले.

दुपारी 2:00 वाजता “भगवान बिरसा मुंडा” यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणुक बिरसा मुंडा चौक ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते ग्रामपंचायत मार्गे वाजत गाजत डिजे च्या तालावर नाचत ठिकठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. मिरवणुक बिरसा मुंडा चौकात परत आणून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विकास प्रबोधन समितीचे अध्यक्ष -विशाल मेश्राम, सचिव-योगेश अलाम, किशोर कुलसंगे, सोईंद्र मडावी, प्रमोद मडावी, कृष्णा कुलसंगे, सूरज मडावी, सोनल कुलसंगे, अविनाश सिडाम, डेव्हिड मडावी, मोहन गेडाम, नागेश उईके, स्वप्नील गेडाम, अरविंद सिडाम, देवानंद गेडाम, नागेश मडावी, चरणदास उईके, शुभम गेडाम, भास्कर उईके, ओमप्रकाश कुलसंगे, उज्वल उईके, तेजस
उईके, पराग उईके, गौरव शेडमाके, लोकेश शेडमाके, आणि सर्व आदिवासी बाधवांसानी सहकार्य केले.
