गडचिरोलीताज्या घडामोडी
वाघाचे हल्ले सुरूच ! हल्ल्यात ३५ वर्षीय महिलेचा बळी

गडचिरोली (दि,१२ नोव्हेंबर)
गडचिरोली मुख्यालयापासून २० किलोमीटर दूर अमिर्झा टोली- करमटोला मार्गावरील शेतपरिसरात धान कापणीसाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात मंदा संतोष खाटे ( वय ३५) ठार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदर महिलेच्या मृत्यूने खाटे परिवारावर शोककळा पसरली आहे .
वन विभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .
जाहिरात
