जाहिरात
चिमुरनेरी

ब्रेकिंग न्यूज – तरुण शेतकऱ्याची विद्युत करंट (शॉक) लागून दुर्दैवी मृत्यू

चिमुर तालुक्यातील बोद्धा येथील घटना

Spread the love

प्रतीनीधी-प्रवीन वाघे (दि,१७ ऑक्टोंबर)

नेरी वरून जवळ असलेल्या बोळधा येथील तरुण शेतकरी अमोल देवराव नाकाडे वय 37 वर्षे आज दि 17 ऑक्टोबर ला सकाळी पहाटे 5 वाजता शेतात पाणी पाहण्यासाठी गेला असता जंगली प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेजारील शेतकऱ्यांनी विद्युत करंट लावला होता सदर बाब या तरुण शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्याचा स्पर्श लावण्यात आलेल्या तारेला झाला यात त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर शेतात जंगली डुकर सुद्धा विद्युत करंट ने मुत्यु झाल्याची बाब समोर आली असून वनविभागाने व पोलीस विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ दोषींवर कारवाई करून आरोपीची कारागृहात रवानगी करावी अशी मागणी मुतुकाच्या कुटुंबियानी व गावकऱ्यांनी केली आहे सदर घटनेने तरुण शेतकऱ्यांचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बोळधा गावात शोककळा पसरली आहे.पुढील तपास वनविभाग व भीसी पोलीस करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button